Anna Hazare raises the ante
October 10, 2026
  • Read Ecopy
  • Circulation
  • Advertise
  • Careers
  • About Us
  • Contact Us
Android AppiPhone AppArattai
Organiser
  • ‌
  • Bharat
    • Assam
    • Bihar
    • Chhattisgarh
    • Jharkhand
    • Maharashtra
    • View All States
  • World
    • Asia
    • Europe
    • North America
    • South America
    • Africa
    • Australia
  • Editorial
  • International
  • Opinion
  • RSS @ 100
  • More
    • World Hindu Congress 2026
    • Op Sindoor
    • Analysis
    • Sports
    • Defence
    • Politics
    • Business
    • Economy
    • Culture
    • Special Report
    • Sci & Tech
    • Entertainment
    • G20
    • Azadi Ka Amrit Mahotsav
    • Vocal4Local
    • Web Stories
    • Education
    • Employment
    • Books
    • Interviews
    • Travel
    • Law
    • Health
    • Obituary
  • Subscribe
    • Subscribe Print Edition
    • Subscribe Ecopy
    • Read Ecopy
  • ‌
  • Bharat
    • Assam
    • Bihar
    • Chhattisgarh
    • Jharkhand
    • Maharashtra
    • View All States
  • World
    • Asia
    • Europe
    • North America
    • South America
    • Africa
    • Australia
  • Editorial
  • International
  • Opinion
  • RSS @ 100
  • More
    • World Hindu Congress 2026
    • Op Sindoor
    • Analysis
    • Sports
    • Defence
    • Politics
    • Business
    • Economy
    • Culture
    • Special Report
    • Sci & Tech
    • Entertainment
    • G20
    • Azadi Ka Amrit Mahotsav
    • Vocal4Local
    • Web Stories
    • Education
    • Employment
    • Books
    • Interviews
    • Travel
    • Law
    • Health
    • Obituary
  • Subscribe
    • Subscribe Print Edition
    • Subscribe Ecopy
    • Read Ecopy
Organiser
  • Home
  • Bharat
  • World
  • Operation Sindoor
  • Editorial
  • Analysis
  • Opinion
  • Culture
  • Defence
  • International Edition
  • RSS @ 100
  • Magazine
  • Read Ecopy
Home General

Anna Hazare raises the ante

Archive ManagerArchive Manager
Nov 12, 2011, 12:00 am IST
inGeneral
Follow on Google News
Facebook
Twitter
WhatsAppTelegramEmail

कांगावची लढाई

 

पार्श्वभूमी : जपानने अमेरिकेच्या पर्ल बंदरावर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धांत आपला सहभाग सुरु केला होता. तोपर्यंत युरोप, रशिया आणि उत्तर आफ्रिकेतच लढाई सीमित होती. जपानने आशियात ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात रणशिंग फुंकले आणि ब्रह्मदेश मार्गे भारतावर आक्रमणाचा प्रयास केला. कांगावची लढाई ही त्याच प्रयत्नांपैकी एक होय.

बंगाल उपसागराच्या  पूर्वतीरावर असलेले आराकान द्वीपकल्प हा जपानसाठी ब्रह्मदेशातील युद्धात रणनीतीच्या  दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश होता. दक्षिणेतील रंगूनकडील रसद मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा ताबा आपल्याकडे ठेवणे जपानला अत्यावश्यक होते. (नकाशा पहा.) कालापझिन आणि कालादान या दोन नद्यांच्या परिसरातील दोन द्वीपकल्पांतून दक्षिणेकडे मार्ग जात. पहिला, बुथिडॉंग, माँगडा, अकयाब आणि मेबॉन आणि दुसरा म्याडकटा, म्योहांग मिनब्या. हे दोन्ही मार्ग कांगाव येथे मिळत असत. ब्रह्मदेशातील प्रसिद्ध चीन टेकड्यांचा हा प्रदेश.

१९४४ अखेरीस ब्रह्मदेशात जपानी फौजेच्या पराभवाची चिन्हे दिसू लागली होती. उत्तर ब्रह्मदेशातून त्यांची माघार सुरु झाली होती. समुद्रमार्गे दक्षिणेकडे जाण्याचे त्यांचे मार्ग ब्रिटीश आरमाराने गोठून टाकले होते. त्यामुळे ब्रह्मदेशातून निसटण्यासाठी जमीनमार्गे  जाणे जपान्यांना भाग होते. या मार्गाची कोंडी करण्याचे काम २५ इंडिअन इन्फंट्री डिव्हिजनला देण्यात आले होते. ५१ इंडिअन इन्फंट्री ब्रिगेड या डिव्हिजनचा भाग होती. ब्रिटीश ३ कमांडो ब्रिगेड  आणि ५१ इंडिअन इन्फंट्री ब्रिगेडना मायबॉनवर सागरी मार्गाने चाल करून कांगावची मोर्चेबंदी उध्वस्त करण्याचे आणि परिसरातील दक्षिण चीन टेकड्यांच्या महत्वाच्या डोंगरशिखरांवर ताबा प्रस्थापित करून मुख्य मार्गावर परिणामकारक प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे काम देण्यात आले होते.

ब्रह्मदेशातील आराकान दीपकल्पात दुसऱ्या महायुद्धाच्या सरत्या वर्षात दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी जपानी सैन्याचा पराभव केला. ब्रिटीश सैन्याच्या या यशात कांगाव लढाईचा लक्षणीय वाटा होता. त्यात लेफ्टनंट कर्नल एस.पी.पी.थोरात यांच्या नेतृत्वाखाली २/२ पंजाब बटालियनने निकाली घणाघात केला.

 

परस्परविरोधी सेनातुकड्या : ब्रिगेडिअर हटन यांच्या नेतृत्वाखालील ५१ इंडिअन ब्रिगेड ’ऑल इंडिअन ब्रिगेड ’ या टोपणनावाने ओळखली जाई. त्यामधील ८/१९ हैदराबाद या पलटणीचे कमांडर लेफ्टनंट कर्नल थिमय्या, १६/१० बलूचचे कमांडर एल.पी. सेन आणि २/२ पंजाबचे कमांडर एस.पी.पी. थोरात. हा एक अपूर्व योगायोग होता. पुढे जाऊन थिमय्या भारतीय सेनेचे सरसेनापती, तर थोरात व सेन लेफ्टनंट जनरलच्या हुद्द्यावर पोहोचले. ५१ इंडिअन ब्रिगेडचा  सामना जपानच्या युद्धविजयी ५४ इन्फंट्री डिव्हिजनशी होता. त्याचे कमांडर  मेजर जनरल मियाकाझी.

 

कांगावची मोर्चेबंदी : म्योहाऊंगकडून दक्षिणेला जाणाऱ्या रस्त्याच्या तिठ्यावर असलेले कांगाव डावपेचाच्या दृष्टीने महत्वाचे होते. (नकाशा पहा.) त्या परिसरातील पर्थ, मेलरोज आणि डेन्स या उंचवटयांवर जपानी सैन्याने  ठाणी उभारली होती. त्यात जपान्यांच्या दोन पायदळ पलटणी तैनात होत्या.  त्यांच्यापाशी तोफखाना, मीडियम मशीनगन्स (एम एम जी) चार इंच मॉर्टर वगैरे शस्त्रास्त्रे होती. मेलरोज हे ठाणे विशेष करून परिणामकारक होते. शेवटपर्यंत मेलरोज आपल्या ताब्यात ठेवणे जपान्यांना आवश्यक होते.

 

वास्तविक या जपानी ठाण्यांवर काबू करण्यासाठी दोन ब्रिगेडची शिबंदी लागणार होती. परंतु जपानी सैन्य माघारींच्या मार्गावर असल्याने आणि ब्रिटीश सैन्याकडे संसाधनांची चणचण असल्याने ही कारवाई एकट्या ५१ ब्रिगेडवर सोपवण्यात आली होती. त्यांना मदत करण्यासाठी तोफखान्याची एक रेजिमेंट त्यांच्याबरोबर होती. ब्रिगेडिअर हटन यांना लवकरात लवकर आपले काम पुरे करण्याचे आदेश देण्यात आले होते.

२७ जानेवारी १९४५ रोजी सकाळी चढाईस सुरुवात झाली. जपानी ‘डेन्स ’ या ठाण्यावर हैदराबादींनी हल्ला केला. त्यांनी ठाण्याचा थोडाच भाग काबीज केला होता. परंतु जपान्यांनी जबरदस्त प्रतिहल्ला चढवून त्यांना मागे परतवले. दुसऱ्या दिवशी ब्रिगेडिअर हटन यांनी बलुचींना ‘मेलरोज’ वर हल्ला चढविण्याचे आदेश दिले. बलुचींनी सरळ दर्शनी बाजूने चढाई केली. परंतु आदल्या दिवशीची पुनरावृत्ती झाली. नशीब एवढेच, की टेकडीच्या एका कोपऱ्यावर बलुची तटून राहू शकले. एकामागून एक असे दोन हल्ले परतल्यामुळे इंडियन ब्रिगेडवर काहीशा निराशेचे सावट जरूर आले. मग हटननी थोरातांना बोलावले आणि दुसऱ्या दिवशी मेलरोजवर परत हल्ला चढवण्याचा आदेश दिला.

 

कांगाववरील चढाईची योजना : मेलरोज वरील हल्ल्याची थोरातांची योजना डावपेची पण जोखीमपूर्ण होती. जपानी ठाण्यावर समोरून हल्ला चढवण्याऐवजी त्यांच्या बाजूने म्हणजे एका बगलेवरून (फ्लँक)  ते प्रहार करणार होते. त्याचा फायदा म्हणजे त्यांच्यावर जपान्यांचा गोळीबार फक्त एका बाजूच्या तुकडीकडून येऊ शकणार होता.  त्याचबरोबर इतर दोन बटालियन त्यांना शत्रूवर समोरच्या बाजूने तोफमारा करू शकणार होत्या. परंतु जपानी ठाण्याच्या बगलेपर्यंत पोचण्यासाठी त्यांना शत्रूसमोरून वळसा घालून जाणे आवश्यक होते आणि त्यावेळी उघड्या भातशेतीतून ओलांडून जाताना जपान्यांच्या मशीनगन्सचा मारा त्यांना सहन करावा लागणार होता.

थोरातांच्या योजनेनुसार सुरुवातीला तीन कंपन्यांनी ठाण्याला वळसा घालून उजव्या बाजूला आपल्या ‘फॉर्मिंग अप प्लेस’ (एफ यू पी ) पर्यंत जलदपणे जायचे होते. दरम्यान तोफखाना शत्रूच्या आघाडीच्या मोर्च्यांवर आणि विशेषत: मशीनगन्सना लक्ष्य करून त्यांच्यावर तुफान गोळीबारी करणार होता, जेणेकरून ते आपल्या खंदकातच बंदिस्त राहतील. त्याचबरोबर ‘स्मोक बॉम्ब’ वापरून मोर्चे आणि आगेकूच करणाऱ्या पंजाब्यांमध्ये एक धुराचा पडदा उभा करण्याची जबाबदारी तोफखान्यांवर होती. हल्ला सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे शत्रूच्या खंदकांवर बॉम्बफेक करण्यास वायूदलाला आदेश देण्यात आले होते. आघाडीचे दस्ते दोनशे यार्डाच्या टप्प्यात पोचेपर्यंत ही बॉम्बफेक चालू राहणार होती आणि नंतर मारा पिछाडीच्या मोर्चांवर  केंद्रित होणार होता. हल्ला दोन कंपन्या चढवणार होत्या. त्यांच्या पाठीमागे एक कंपनी आणि चौथी राखीव राहणार होती.

 

तुफानी हल्ला : २९ तारखेला उजाडताच आघाडीच्या तीन कंपन्यांनी आगेकूच केले. शत्रूची ठाणी ओलांडताना थोरातांनी तोफखान्याला गोळाफेक आणि धुराचा पडदा सुरु करायचे हुकूम सोडले.  मशीनगन्सच्या माऱ्याला न जुमानता जलद गतीने जवानांनी भातशेतीचे मैदान पार केले. त्याचबरोबर जपान्यांचा तोफखानाही आग ओकू लागला. घायाळ आणि मृतांची संख्या वाढत होती. थोड्याच वेळात पंजाबी एफयूपीमध्ये पोचले आणि वेळेवर हल्लाबोल झाला.

आता  टेकडीवरील चढ चालू झाला. एका बाजूने हल्ला करत असल्याने शत्रूच्या एकामागून एक फळीचें मोर्चे समोर येत होते. गोळीबार वाढत चालला होता आणि त्या खंबीर विरोधापुढे आघाडीच्या फळीचा हल्ला काहीसा मंदावत चालला होता.  अचानक एक स्वर्गीय प्रेरणा त्यांच्या अंगात सळसळली. सावधगिरीचे जू त्यांनी मनावरून फेकून दिले आणि ते तडक  अडखळणाऱ्या आघाडीच्या दस्त्यांपर्यंत पोचले. त्यांना पाहताच त्या आघाडीच्या जवानांमध्ये एक नवा जोम उसळला. ‘सत् श्री अकाल- ’ शीख गर्जले, ‘साब आये’. मुस्लिम कंपनीने नारा दिला. ‘मारो हैदरी या अली.’ भान विसरून सारे शत्रूवर तुटून पडले.

खंदकात उड्या मारून ओरडत, किंचाळत, शिव्यांची लाखोली वाहत कापाकापी आणि संगिनींची भोसकाभोसकी चालू झाली. जपानी चवताळलेल्या वाघासारखे लढत होते. दोन रणशूरांतील ते द्वंद्व होते. एका उदात्त कर्मयोगाचा साक्षात्कारच ! सर्वत्र रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.  एकाएकी थोरातांना एक तरणाबांड मिसरूड न फुटलेला तरुण जपानी अधिकारी आपली तलवार परजीत खंदकातून बाहेर येताना दिसला. धारदार पात्याने त्याने एकाचे खांडोळे  केले. दुसऱ्यावर झडप घातली. थोरात त्याचे असामान्य धैर्य पाहून क्षणभर स्तिमित झाले. थोरातांनी आपल्या स्टेनगनमधून गोळी झाडली. ती वर्मी लागली आणि तो जागीच कोसळला.

तेवढ्यात डोक्यावर फायटर विमाने दिसू लागली. प्रतिकूल हवामानामुळे त्यांना विलंब झाला होता. पंजाबी शत्रूच्या निकट असल्याने त्यांनी पिछाडीच्या शत्रू ठाण्यावर बॉम्बवर्षाव सुरु केला. मेलरोज टेकडीवरील अर्ध्या मोर्च्यावर पंजाब्यांनी ताबा केला. त्यानंतर थोरातांच्या मोर्चावर प्रतिहल्ले आले आणि ते खंबीरपणे परतवले गेले. अखेरीस मेलरोजचा ताबा २/२ पंजाबला मिळालाच; पण दोनच दिवसांत ५१ इंडियन ब्रिगेडने जपान्यांच्या  १५४  इन्फंट्री रेजिमेंटला माघार घ्यायला लावली; तेही आपल्या जखमा चाटत !    

थोरातांना त्यांच्या बुलंद, कल्पक व सुबुद्ध नेतृत्वासाठी आणि वैयक्तिक शौर्यासाठी ‘डिस्टिंग्वीश्ड सर्व्हिस ऑर्डर (डीएसओ) हा उच्च वीरसन्मान प्रदान करण्यात आला.

 

संदर्भ :

  • थोरात एस. पी. पी., लेफ्टनंट जनरल, ‘फ्रॉम रेव्हेले टू रिटरिट’, अलाइड पब्लिशर्स.
  • पित्रे शशिकांत, मेजर जनरल, ‘झुंझार सेनानी, लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
  • मोरमन, टिम, (२००६), ‘ब्रिटिश कमांडोज १९४०-४६, ओस्प्रे पब्लिशिंग.

         

Share
Tweet
SendShareSend
✮ Subscribe Organiser YouTube Channel. ✮
✮ Join Organiser's WhatsApp channel for Nationalist views beyond the news. ✮
Previous News

13th petrol price hike in 14 months

Next News

It needs a multi-pronged strategy to fight corruption

Related News

Delhi Riots Case: Police seeks cancellation of Sharjeel Imam’s bail; Cites interaction with media, condition violation

Passenger blasts CJP’s Dipke for causing public inconvenience

‘Who is he? Shut down courts if…’: Passenger blasts CJP’s Dipke and ‘Cockroaches’ for causing public inconvenience

Lucknow’s Seva Jyoti Yatra Marks 25 Years of PM Modi’s Public Life

From Village to Global: Lucknow’s Seva Jyoti Yatra marks 25 years of PM Modi’s public life

Illegal Bangladeshi migrants detained at Kamakhya station in Assam

Assam: 57 illegal Bangladeshi migrants arrested at Kamakhya station; Infiltrators possessed forged Aadhaar & Voter ID

The ‘Kasab Playbook’? leaked CJP chats urge protesters to wear tilak & kalawa, plot to spark violence in Hindu name?

Representative Image

Chhattisgarh | Kanker Explosives Conspiracy Case: Two Maoists Jan Militia members sentenced to 10 years imprisonment

Load More

Latest News

Delhi Riots Case: Police seeks cancellation of Sharjeel Imam’s bail; Cites interaction with media, condition violation

Passenger blasts CJP’s Dipke for causing public inconvenience

‘Who is he? Shut down courts if…’: Passenger blasts CJP’s Dipke and ‘Cockroaches’ for causing public inconvenience

Lucknow’s Seva Jyoti Yatra Marks 25 Years of PM Modi’s Public Life

From Village to Global: Lucknow’s Seva Jyoti Yatra marks 25 years of PM Modi’s public life

Illegal Bangladeshi migrants detained at Kamakhya station in Assam

Assam: 57 illegal Bangladeshi migrants arrested at Kamakhya station; Infiltrators possessed forged Aadhaar & Voter ID

The ‘Kasab Playbook’? leaked CJP chats urge protesters to wear tilak & kalawa, plot to spark violence in Hindu name?

Representative Image

Chhattisgarh | Kanker Explosives Conspiracy Case: Two Maoists Jan Militia members sentenced to 10 years imprisonment

Karnataka govt’s Anjanadri Mandir takeover set aside by High Court; Vidyadasa Baba’s puja rights upheld

Bommai Kolu celebrates Hindu devotion and storytelling through traditional dolls handcrafted by generations of artisans

From Wood and Clay to Worship: The Hindu artisans keeping the centuries-old Bommai Kolu tradition alive

India issued a sharp warning to Pakistan & asserted that it will not bow to nuclear blackmail

India slams Pakistan at UN: ‘Will not bow to nuclear blackmail’; Warns against using nukes as instruments of statecraft

V.D. Satheeshan (Left) Adoor Prakash (RIght)

Keralam Congress rift deepens as CM Satheeshan rejects UDF convener Adoor Prakash’s allegations of unilateral decisions

Load More
  • Privacy
  • Terms
  • Cookie Policy
  • Refund and Cancellation
  • Delivery and Shipping

© Bharat Prakashan (Delhi) Limited.
Tech-enabled by Ananthapuri Technologies

  • Home
  • Search Organiser
  • Bharat
    • Assam
    • Bihar
    • Chhattisgarh
    • Jharkhand
    • Maharashtra
    • View All States
  • World
    • Asia
    • Africa
    • North America
    • South America
    • Europe
    • Australia
  • Editorial
  • Operation Sindoor
  • Opinion
  • Analysis
  • Defence
  • Culture
  • Sports
  • Business
  • RSS @ 100
  • Entertainment
  • More ..
    • Sci & Tech
    • Vocal4Local
    • Special Report
    • Education
    • Employment
    • Books
    • Interviews
    • Travel
    • Health
    • Politics
    • Law
    • Economy
    • Obituary
  • Subscribe Magazine
  • Read Ecopy
  • Advertise
  • Circulation
  • Careers
  • About Us
  • Contact Us
  • Policies & Terms
    • Privacy Policy
    • Cookie Policy
    • Refund and Cancellation
    • Terms of Use

© Bharat Prakashan (Delhi) Limited.
Tech-enabled by Ananthapuri Technologies